जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेला १० कोटी रुपयांचा. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विशेष तरतुदीअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून, याबाबतचा शासन निर्णय ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.