आरोग्यमंत्र्यांना 'मॅट'चा कायदेशीर झटका! सीएस आणि डीएचओंवर कारवाईबाबत मोठा निकाल, निलंबन केले रद्द. नांदेड : सहाव्या वेतन आयोगानुसार जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक संचालक ही ग्रेड पे ६६०० असलेली समकक्ष पदे आहेत. या पदांच्या नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असून शिस्तभंग विषयक प्राधिकारीही तेच आहेत. त्यामुळे या पदाच्या अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईचे अधिकार सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांना नाहीत, असा निर्वाळा मुंबई मॅटचे प्रशासकीय सदस्य देबाशिष चक्रबर्ती यांनी २४ सप्टेंबर रोजी दिला.