वेल्हे: मोसे, पानशेतसह बारा मावळ खोऱ्यातील मावळ्यांचे स्फूर्तिदैवत आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पानशेतजवळील शिरकोली (ता. राजगड) येथील शिवक. राजगड) येथील शिवकालीन श्री शिरकाईदेवी देवस्थानाला राज्य शासनाने गुरुवारी (दि. ५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या दर्जामुळे शिरकाई देवस्थानच्या विकासाला चालना मिळणार असून, देवस्थानला शिवकालीन वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे..