Provide quality services to the citizens promptly within the prescribed time frame: Dr. Jadhav जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा पारदर्शकपणे, सुलभतेने आणि निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. नागरिकांना शासकीय कामांसाठी अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच प्रलंबित अर्जाचा नियमित आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ.