शहापूर : राजेश जागरेशहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या हद्दीतील वेहलोंढे गावाच्या डोंगरशेत परिसरात खैराच्या मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत. परिसरातील डोंगरशेत भागात मोठमोठी झाडे तोडली जात असल्याने वनसंपत्तीची अक्षरशः लूट सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. खैराच्या लाकडाला बाजारात मोठी मागणी आणि किंमत असल्याने या वृक्षांची बेकायदा तोड करून तस्करी केली जात असल्याची चर्चा परिसरात आहे..विशेष म्हणजे मागील महिन्यातही याच परिसरात वृक्षतोडीची घटना घडली होती.