योगेश काशिद, बीड प्रतिनिधीBeed Fake Sports Certificate Scam : बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह इमामपूर शिवारात संशयास्पद अवस्थेत. खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणाऱ्यांचे मोठे रॅकेट वैभवने उघडकीस आणले होते. दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. घोटाळा समोर आल्यानंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या आणि धमकी देणाऱ्यांची नावे व ऑडिओ त्याने रेकॉर्ड करून ठेवले होते. .