महिला आयटी इंजिनिअरच्या ८७.५२ लाखांच्या फसवणुकीत दोन वर्षात एकही अटक नाही; तपास अधिकाऱ्याच्या उत्तरावर नाराजी, सह पोलीस आयुक्तांकडून मागवले स्पष्टीकरण. पुणे : पुण्यातील महिला सॉफ्टवेअर अभियंत्याची ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ८७ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पुणे सायबर पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आहे. दोन वर्षांपासून तपास सुरू असूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.