सध्या बॉलिवूडमधील रामायण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्यादिवसापासूनच चांगली कमाई केली आहे. आता अनुपम खेर यांनी चित्रपटाबाबत पोस्ट केली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून वाहवाह मिळवली आहे. आता चित्रपट पहिल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रामायण या सिनेमाचा खरा रिव्ह्यू सांगितला आहे.