बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याला उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे पोलीस कंट्रोल रूममध्ये धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. धमकीनंतर पोलिसांनी जलसा बंगल्याची तपासणी केली असता, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. धमकी कोणी आणि कुठून दिली, याचा तपास पोलीस करत आहेत. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा अमिताभ बच्चन यांचा बंगला उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.