Beed Vaibhav Chavan Audio Clip: बोगस खेळाडू प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाण याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित क्लिपमुळे वैभवचा घातपात (हत्या) झाल्याच्या नातेवाईकांच्या आरोपांना बळ मिळाले आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांना काही पुरावे दिल्याचा उल्लेख त्याने केला आहे.