प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांनी मराठीतही अनेक गाणी गायली आहेत. त्यातील अनेक गाणी श्रीकांत ठाकरे यांच्या दोस्तीतून तयार झाली आहेत. ठाकरे यांनी मोहम्मद रफींना या गाण्यासाठी मराठी भाषा शिकवली. जादूई आवाजाचं देणं लाभलेले गायक मोहम्मद रफी साहेब आणि ठाकरे कुटुंबाचा दोस्ताना फेमस आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे यांनी संगितकार म्हणून मराठीत अनेक अवीट गोडीची गाणी दिली आहेत. अशाच एका गाण्यासाठी त्यांनी रफी साहेबांना विनंती केली.