पुणे: संसर्गजन्य आजारांचे वाढते आव्हान लक्षात घेऊन पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात ‘एनआयव्ही’ने आधुनिक वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपू. नक्षत्र महासंगणकामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका या तीन विषाणूजन्य आजारांचे एकाच वेळी निदान करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर संस्थेत संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांचे निदान अधिक जलद, अचूक आणि तुलनेने कमी खर्चात करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हे संशोधन प्रत्यक्षात साकारण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील, असा अंदाज आहे..