उघडे खड्डे, खोदकाम केलेले भाग, अपूर्ण रस्ते आणि अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य यामुळे नागरिकांच्या अपघाताचा धोका कायम असतो. दिवाळीच्या सुट्यांमध्ये कामगारांची संख्या कमी होणे आणि आवश्यक साधनसामग्रीचा अभाव यामुळे हा धोका आणखी वाढतो. पुणे : दिवाळीच्या सुट्यांमध्ये बांधकामाचा वेग कायम ठेवण्याच्या नावाखाली नागरिक आणि कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ठेकेदारांची आता गय केली जाणार नाही. पुणे महानगरपालिकेने शहरातील सुरू असलेल्या बांधकामांबाबत ठेकेदारांना कडक इशारा दिला आहे.