नवी दिल्ली : समुद्रसपाटीपासून तब्बल ५,२५६ मीटर म्हणजे १७,२४४ फूट उंचावर भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन उभारण्याची तयारी सुरू आहे. भारत हिमालयाच्या कुशीत. भारत हिमालयाच्या कुशीत आपल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाची योजना आखत असून, त्याअंतर्गत लडाखमधील या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे..हिमाचल प्रदेशातील बिलासपूरला लडाखमधील लेहशी जोडणारी ही प्रस्तावित रेल्वे लाईन भारतीय रेल्वेला देशाच्या उत्तर सीमेच्या अधिक जवळ नेईलच, शिवाय एक नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित करेल.