आशिष ल. पाटीलगुडाळ : राज्य सरकारने गोकुळवर पाच शासनयुक्त संचालक नियुक्तीचा घेतलेला निर्णय अमलात आल्यास तब्बल ३५ जणांचे जम्बो संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. संच. संचालकांची संख्या वाढल्याने प्रशासकीय खर्चासह वाढीव मनुष्यबळाचा भुर्दंड ‘गोकुळ’वर बसणार आहे..गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकूण २८ संचालक सभागृहात येणार असे गृहीत धरून व्यवस्थापनाने जुन्या सभागृहाची थोडीफार तोडफोड करून विस्तार केला आहे. त्यामध्ये दाटीवाटीने ३० नव्या कोर्या खुर्च्यांची मांडणीही करण्यात आली आहे.