भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं सप्टेंबर तिमाहीमधील कामगिरीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी वाढून 12076 कोटींवर पोहोचला आहे.गेल्या वर्षी ही रक्कम 10053 कोटी रुपये होती. एलआयसीचं एकूण उत्पन्न देखील 262739 कोटींवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत हे उत्पन्न 239614 कोटी रुपये होतं.