Raju Shetti Sugarcane Agitation Kolhapur : उसाला प्रतिटन 4,500 रुपये दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. कोल्हापूर : ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी झालेली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक फिस्कटली आहे. ऊस आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत 3900 रुपये पहिली उचल आणि कारखाना सुरू झाल्यानंतर 100 रुपये असा प्रस्ताव कारखानदारांच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला. तर शेतकरी संघटना 4500 रुपयांवरून 4200 रुपये भावापर्यंत खाली आली आहे.