नवी मुंबई : कोपरखैरणे येथील सेक्टर १ मधील एका लॉन्ड्रीच्या दुकानात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एका तरुणीसह दोन जण जखमी झाले असून, घटनेमुळे. या प्रकरणी विकास उर्फ चार्ली नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे..घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.