श्रीवर्धन : एकीकडे वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगरपरिषदेकडून घंटागाडीद्वारे शहरात ‘सुका दुष्काळ आहे, पाणी जपून वापर. मात्र, दुसरीकडे नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रानवली धरणातून श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी भोस्ते फाट्यावर पुन्हा एकदा फुटल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या आहेत.