खांदा कॉलनी : पनवेल शहर आणि परिसरात पुन्हा एकदा हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला असून आरोग्या. महामार्गावरून दिवसरात्र हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात हवेत पसरते..त्यातच बांधकामे आणि रस्त्यांवरील धुळीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी पुढाकार घेतला आहे. महामार्गालगत असलेल्या झाडांवर पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे..