खांदा कॉलनी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी पनवेल परिसरातून नव्या मार्गांची सुविधा उपलब्ध होत असताना दुसरीकडे दिशादर्शक फलकांचा अभाव वाहनचालकां. पनवेलमधील ठाणा नाका तसेच कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथून सुरू झालेल्या विमानतळाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या परिसरात दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे..नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ व्हावी, यासाठी विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे.