या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय महामार्गावरून एक इंचही मागे हटणार नाही, असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला पहिली उचल 4500 रूपये मिळावी या मागणीसाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या 'रास्ता रोको' आंदोलनाचा आज (5 नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही हजारो शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला.