Sharad Pawar Health Update: डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे. वैद्यकीय तपासण्या आणि आवश्यक उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Health Update) यांना काल पुण्यातील रूबी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पवार पुण्यातून मुंबईसाठी रवाना झाले. पण रात्री अचानक तब्येत बिघडल्याने पवारांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.