Jalgaon Fake Khoya Seizedजळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कार. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात आणण्यात आलेला २४० किलो संशयित बनावट खवा प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. या खव्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ६५ हजार रुपये असून, या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे..दिवाळीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.