पश्चिम बंगालमधील टीएमसी कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत 1,02,79,000 रुपये जप्त केले आहेत. ममता बॅनर्जींना यामुळे मोठा धक्का बसला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या खासगी सहायकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जींनी केला आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागे लागलेलं ग्रहण अजूनही सुटता दिसत नाहीये. आता थेट ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीच्या एका कार्यालयात 1,02,79,000 रुपये सापडले आहेत.