मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा सोर्स मुख्यमंत्र्यांना सांगण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु सोर्सच्या जीविताला धोका होऊ नये अशी अट घातली आहे. SIT चौकशी सुरू असताना, जरांगे यांनी आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप केला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवून खळबळ उडवून दिली होती. या क्लिपमध्ये 500 कोटींचा आरोप करण्यात आला होता.