गोकुळच्या मुद्द्यावर वाद चिघळला आहे. सतेज पाटील कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता महायुतीमधील वाद हा पुढे आला. शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीला धक्का बसला. गोकुळ संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमले आहेत. ज्यानंतर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच सतेज पाटील यांनीही गंभीर आरोप केले. सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी नाकारले, कोर्टात दिलासा मिळणार नाही, यानंतर मंत्रिमंडळात यांनी आदेश काढल्याचे त्यांनी म्हटले.