जत : जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेल यांनी तळ ग. विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेल यांनी तळ गाठला असून, जनावरांना पाणी आणि चारा मिळणेही मुश्कील झाले आहे. सध्या तालुक्यातील ४९ गावांत ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येळवी आणि कुणीकोणूर येथील टँकरचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. चाऱ्याचे दर वाढल्याने शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. .