राज्यातील इतर भागांतही तापमानाचा पारा चढलेला आहे. विदर्भातील अकोला येथे ३४.८, अमरावती येथे ३४.८, तर नागपूर येथे ३२.६ अंश तापमान होते. मुंबई : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने दडी मारली असून उन्हाचा चटका कायम आहे. बुधवारी मुंबईत राज्यातील सर्वाधिक ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.महाबळेश्वर येथे सर्वात कमी १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमान ३२.७ अंश, तर किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस होते.