मुंबई : बोरिवलीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात पालिका प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाईचे गंभीर पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. अनधिकृत बांधकामे. अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने महापालिका आयुक्तांना दंडाला सामोरे जावे लागल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.या प्रकाराला संबंधित अधिकाऱ्यांसह जबाबदार असलेल्या विधी विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले.