Akola News: राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यातील मतभ. आता अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेतूनही महायुतीमधील संघर्षाची नवी घटना समोर आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांविरोधात आणलेला अपात्रतेचा ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे..हिवरखेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत.