लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमधील आरक्षणात बदल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला मिश्किल टोला लगावला. उत्तर प्रदेशातील एका मतदारसंघात 1952 पासून आरक्षण कायम असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, आरक्षित जागांच्या फेरबदलाबाबत न्यायालयाने नेमकी काय भूमिका घेतली? देशामध्ये विविध आंदोलनांची मालिका सुरु आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश सूर्यकांत यांनी मिश्किल अंदाजामध्ये भाष्य केलं आहे.