IND vs NZ : टीम इंडियाने आज न्यूझीलंड विरुद्ध पहिला वनडे सामना जिंकून चांगली सुरुवात केली. या मॅचमध्ये एका 24 वर्षाच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या भेदक गोलंदाजीने नवीन अशा निर्माण झाल्या आहेत. काय आहे अंशुल कंबोजमध्ये असं? भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज ऑकलंडच्या ईडन पार्कवर पहिला वनडे सामना झाला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.