अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये पक्षाच्या खराब कामगिरीसाठी इराण युद्धाला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक मतदारांनी यावेळी पक्षाला मतदान केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील मध्यावती निवडणूकांचे निकाल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धक्कादायक ठरले आहेत. रिपब्लिकन पार्टीचे अनेक मोठे चेहरे या निवडणूकीत हरले आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने सिनेटवरील आपली पकड हरवली आहे. कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी मिडटर्ममधील हा मोठा पराभव आहे.