नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकुल योजनेच्या (शहरी) उद्दिष्टाची १०० टक्के पूर्तता झाली आह. या योजनेंतर्गत एकूण २ हजार ८ घरकुल प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे..सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरिकांना दिला जातो. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येते. जिल्हास्तरावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते..