चंद्रपूर : वशीकरणाचे टोटके आणि वनौषधींच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून ५३ हजार रुपये घेतल्याचा आरोप असलेल्या सतीश गिळसावळेबाबा यांच्यावर पोलिसांन. चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे..प्राप्त माहितीनुसार, वशीकरणाचे टोटके करून देण्यासह वनौषधींच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचे आश्वासन देत संबंधित व्यक्तीकडून ५० हजार रुपये रोख आणि तीन हजार रुपये फोनपेद्वारे स्वीकारल्याचा आरोप आहे.