Agniveer : अग्निवीर योजनेसंदर्भात केंद्र सरकारनं कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. 75 टक्के अग्निवीरांना 2 वर्ष अतिरिक्त सेवेची संधी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. . नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्राच्या कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अश्विनी वैष्णव आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात आली.