चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून. तब्बल दहा ते बारा दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला अखेर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर कायदेशीर वळण मिळाले आहे. गजानन धनराज गुडधे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून, या घटनेमुळे चिमूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे..