Wardha News : शासनाकडून अंगणवाड्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी प्रति अंगणवाडी २ हजार रुपये प्रशासकीय खर्च आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या गणवेशासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांचा निधी दिला जातो. वर्धा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांसाठी हा निधी जून महिन्यात प्राप्त झाला होता. मात्र, आर्वी आणि वर्धा बालविकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि हलगर्जी कारभारामुळे हा निधी विहित मुदतीत वितरित न झाल्याने अखेर शासनाकडे परत गेल्याची माहिती समोर आली आहे.