Satara District Bank Election Results 2026: शंभूराज, जयकुमार, संजीवराजे, उदयसिंह पाटील विजयी. सातारा : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने ( अजित पवार ) ८, तर शिंदेसेनेने ४ जागांवर विजय मिळवला. कोरेगाव सोसायटीत राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांना प्रत्येकी ४४ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी घेण्यात आली. त्यामध्ये सुनील माने विजयी ठरले.सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी ९ संचालक बिनविरोध निवडून आले होते.