कराड : चंद्रजित पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या विजयामागे भाजपचे. अतुलबाबा भोसले यांची भूमिका निर्णायक ठरली. मागील निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अतुलबाबा यंदाही किंगमेकर ठरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात 'ज्यांच्या बाजूने अतुलबाबा, त्यांचाच विजय' हे समीकरण पुन्हा अधोरेखित झाले आहे..आमदार भोसले यांचे समर्थक म्हणून ओळख असलेले ३२ ठरावधारक मतदानास पात्र होते.