Abhijeet dipke : लाचखोरीप्रकरणी ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ऑनलाईन फॉर्म 6 मधून SIR शी संबंधित घोषणापत्र हटवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर कॉकरोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजीत दीपकेने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.