Dhanatrayodashi 2026: धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. यंदा ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी असून या दिवशी काही खास उपाय करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया वर्षभर घरात सुख-समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावे. दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हा दिवस सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो.