Instagram Scam: बिहारमधल्या एका इंजिनिअरला इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली. त्याची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली. नेमकं काय झालं आहे याबद्दल अधिक जाणून घ्या. Bihar Crime News: बिहारमधल्या दरभंगामध्ये एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री एका तरुण इंजिनिअरला महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका इंजिनिअरची तब्बल १.५ कोटी रुपयांची फसवणूक झाली. एका तरुणीने त्याला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याच्याकडून १.५ कोटी रुपये उकळले.