राजकुमार बन्ने सौंदलगा : आप्पाचीवाडी क्रॉसपासून सौंदलगा परिसरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, कोल्हापूरच्या दिशेने जाणारा महामार्ग पूर्णतः बंद. त्यामुळे स्थानिक तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर वाहने अडकून पडल्याने वाहनचालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची तसेच राहण्याची मोठी गैरसोय होत आहे..कोल्हापूरच्या दिशेने जाणारा महामार्ग बंद असला तरी निपाणीच्या दिशेने येणारा महामार्ग सुरू आहे.