भाईंदर/भिवंडी: ठाणे, भिवंडी आणि मिरा-भाईंदरकरांसाठी मेट्रोच्या प्रतीक्षेतील आनंदाची बातमी आहे. ठाणे ते भिवंडी मेट्रो मार्गावर मंगळवारी प्रत्यक्ष रेल्वे चाचणी घे. हा टप्पा डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने आमदार नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वर्षअखेरीस ठाणे-भिवंडी आणि मिरा-भाईंदरच्या प्रवाशांना मेट्रो प्रवासाची सुविधा मिळण्याच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत..