राज्यभरात रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात. याच मोहिमेअंतर्गत नाशिक शहरातही वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. Nashik News : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत मोठी वाढ झाली आहे.