मुंबई: सणासुदीच्या काळात मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उघडकीस आणला आहे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न म. राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, चेंबूरमध्ये एका लक्झरी बसमधून अस्वच्छ व असुरक्षित पद्धतीने वाहतूक केला जाणारा ४ हजार २ किलो मिठाई व स्वीट हलव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या या साठ्याची किंमत ११ लाख ११ हजार १७४ रुपये आहे..