Pune Police: बदलीच्या कारणावरून आलेल्या रागातून या कॉन्स्टेबलने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे: पुणे पोलीस दलात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी (बंगल्यावर) कार घुसवायचा प्रयत्न करणाऱ्या एका मद्यधुंद (Pune Police) पोलीस कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश भिसे यांनी पोलिस आयुक्तांच्या आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.