Sharad Pawar Pune: आज डॉक्टरांनी तपासणीनंतर शरद पवारांना डिस्चार्ज दिला आहे. त्यांना घरी नेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज (बुधवारी, ता 4) रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वातावरण बदलल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना छातीत कफ झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.